Good news Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg record traffic on Diwali season  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: दिवाळीत समृद्धी महामार्गावरून विक्रमी वाहतूक; एकाच दिवशी धावल्या 'इतक्या' कार, अपघातही कमी

Samruddhi Mahamarg News: गेल्या महिन्याभराच्या कालावधीत महामार्गावरून विक्रमी संख्येने वाहने धावली आहेत.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Latest News

विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा समृ्द्धी महामार्ग नेहमी अपघातांमुळे चर्चेत राहिलेला आहे. समृद्धीवर आजवर अनेक अपघात झाले असून यावरून अनेकांनी सरकारवर टीकेचा भडीमार देखील केला आहे. मात्र, आता हाच महामार्ग प्रवाशांसाठी वरदान ठरताना दिसून येत आहे. कारण, गेल्या महिन्याभराच्या कालावधीत महामार्गावरून विक्रमी संख्येने वाहने धावली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीच्या काळात अनेकांनी समृद्धी महामार्गावरून ( Samruddhi Mahamarg) प्रवास करण्यास पसंती दिली आहे. १८ नोव्हेंबरच्या दिवशी महामार्गावरून तब्बल ३० हजार ५४३ कार धावल्या आहेत. महामार्ग सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच कार धावल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे, या काळात अपघाताची (Accident) कोणतीही मोठी घटना घडली नाही. रस्ते आणि परिवहन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, यापूर्वी १ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान या महामार्गावरून २ लाख ६५ हजार ८५६ कार धावल्या होत्या.

आता नोव्हेंबर महिन्याच्या १ ते २१ या कालावधी दरम्यान हीच आकडेवारी तब्बल ३ लाख ८२ हजार ४१६ वर गेली आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारची वाहतूक झाली असली तरी, या कालावधीमध्ये अत्यंत कमी अपघात झाले आहेत.

त्याचबरोबर हा महामार्ग सुरू झाल्यापासून आपघातांचीही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात कमी आहे. १८ नोव्हेंबरच्या दिवशी समृद्धी महामार्गावरून तब्बल ३० हजारांहून अधिक वाहने धावल्याने एकाच दिवशी कारने गाठलेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. नोव्हेंबर महिन्यात समृद्धीवर १३ अपघात झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT