Good news for travelers msrtc st buses will run as per schedule maratha reservation manoj jarange patil  Saam TV
महाराष्ट्र

ST Bus News: मनोज जरांगेंचं उपोषण मागे, राज्यातील एसटी बससेवा पूर्ववत होणार; प्रवाशांचं टेन्शन मिटणार

Satish Daud

ST Bus Service Started in Maharashtra

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातील अनेक मराठा बांधवांनी पाठिंबा दिला. जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली. या आंदोलनाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला. ठिकठिकाणी आंदोलकांनी बसेसची जाळपोळ तसेच तोडफोड केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू होती. आता राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बससेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यातील एसटी बससेवा पूर्वरत होईल, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. महामंडळाने गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केली.

त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनामुळे पुणे आगाराने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या होत्या. गेले दोन दिवस पुण्यातून जाणाऱ्या ७८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

अखेर गुरूवारी रात्री मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर एसटी महामंडळाने पुण्यातून त्यांची सर्व बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून संपूर्ण दिवसाला साधारण १३०० ते १४०० एसटी बसच्या फेऱ्या सुरू असतात.

त्या सर्व पूर्ववत केल्या जाणार आहेत. तसेच, रात्री दहानंतर इतर आगाराच्या पुण्यात अडकून पडलेल्या बस रवाना केल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT