Botanical Garden
Botanical Garden 
महाराष्ट्र

Chandrapur News: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! बॉटनिकल गार्डन पाहण्यासाठी नाही लागणार शुल्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrapur Botanical Garden :

वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले. पुढील तीन महिने पर्यटनासाठी बोटॅनिकल गार्डन मोफत असेल, अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.(Latest News)

चंद्रपूरमध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून २० कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोहोचला आहे. तसेच ॲडव्हाँटेज चंद्रपूरमध्ये विविध उद्योगांचे ७५ हजार कोटींचे सामंजस्य करार येथे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चंद्रपूरमध्ये उद्योगांनी गुंतवणूक केली असून पुढील दहा वर्षात येथील बेरोजगारी संपुष्टात येईल. चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर विसापूर येथे श्रद्धेय श्री. अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डनची) 108 हेक्टर क्षेत्रात निर्मिती करण्यात आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज चंद्रपूरमध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 590 कोटी, बॉटनिकल गार्डनचा पहिला टप्पा 264 कोटी, महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना 270 कोटी आणि मलनि:स्सारण प्रकल्प 570 कोटी अशा एकूण 1667 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरात आज करण्यात आले. निवडणुकीनंतरही चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सैनिक स्कूल आदींचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा चंद्रपूरला यावे, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे 50 एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 589 कोटी 93 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रस्तावित बांधकाम एकूण 87290 चौ. मीटरवर होणार असून यामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय कार्यालये, सेमिनार हॉल, वर्गखोली.

व्याख्यान सभागृह, बोर्ड मिटींग रुम, फॅकल्टी रुम, 700 विद्यार्थीनींसाठी बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह दोन वसतीगृह इमारती, ग्रंथालय इमारत, डीजीटल लायब्ररी, 860 क्षमतेची सभागृह इमारत, कॅफेटेरीया, भोजनगृह इमारत, क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल व विविध पारंपरिक खेळांकरीता इनडोअर स्पोर्टस् बिल्डिंग, व्यायामशाळा, कराटे, बॉक्सिंग, कुस्तीसाठी विशेष हॉल, दर्शकांसाठी गॅलरी, अतिथीगृह इमारत, कर्मचारी निवास आदींची तरतूद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT