ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

ST Employee Payment: एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, दिवाळीआधीच पगार मिळणार

ST Employee : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच पगार मिळणार आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने त्यांचा पगार दिवाळीआधीच देण्याचा निर्णय घेतला असून सरकारने त्यासाठी लागणारी रक्कम महामंडळाकडे वर्ग केलीय. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे सवलतमूल्य ३५०.०० कोटी रुपये महामंडळाला प्रदान करण्यात आलीय.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. मात्र त्यापूर्वी येणाऱ्या दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांची ही समस्या आता शासनाच्या या निर्णयाने दूर होणार आहे. राज्यात सणासुदीच्या दिवसात प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो.

दिवाळी सणाच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो.त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड व्हावी, यासाठी महामंडळाने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होत असतो. यंदा सोमवारी २८ ऑक्टोबरला वसूबारस ते रविवारी ३ नोव्हेंबरला भाऊबीज यादरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार ७ नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे.

यासाठी राज्य सरकारकडून लवकर निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केलीय.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य मार्ग पररवहन महामंडळास माहे सप्टेंबर, 2024 च्या सवलतमूल्याच्या

प्रतिपूर्तीपोटी रु.350.00 कोटी इतकी रक्कम (अक्षरी रूपये तीनशे पन् नास कोटी फक्त) रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2.

सदर रु.350.00 कोटी हा सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च मागणी क्र.बी-3 लेखार्शिष 2041 वाहनांवरील कर

(00) 001, संचालन व प्रशासन, (01) पररवहन आयुक्त (01) (01) आस्थापना- परिवहन आयुक्त

(अरनवायग) (दत्तमत) (20410018) 33-अथगसहाय्य” या लेखार्शिषाखाली खच टाकण्यात यावा.

सदरचे अथगसहाय्य हे “बिनर्शत” आहे.

3.

यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आंहरित

करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी.

4.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.562/2024/व्यय-8,

रद.15.10.2024 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गर्मित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT