Girls Student  
महाराष्ट्र

Girls Student: आनंदाची बातमी! व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात मोठी सवलत; ५० टक्क्याऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ

Girls Student : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

शिक्षण घेण्याची उमेद असलेल्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात आलीय. राज्यातील महिला सक्षमीकरणातंर्गत, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये निधी अभावी कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिंनींचं परीक्षा १०० टक्के माफ करण्यात आले आहे.

शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित महाविद्यालये, अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये  तंत्रनिकेतने  सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT