Gondiya talathi  Saam Tv
महाराष्ट्र

८०० रुपयांची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; पानगाव येथील घटना

लाचलुचपत पथकाने संबधित तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित घोरमारे

गोंदिया : पैशांचा मोह माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण किरकोळ पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यातून समोर आला आहे. येथील एका तलाठ्याने 800 रुपयांसाठी आपल्या नोकरीवर गदा आणली आहे. शेत जमिनीचा सातबारा दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या या तलाठ्याला गोंदिया एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. मनोज कोहपरे असे आरोपी तलाठ्याने नाव आहे. (Gondiya Crime Talathi Caught Red Handed Taking A Bribe Of Rs 800)

गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील शेतकऱ्याला शेतजमीन विकायची होती. त्यासाठी या शेतकरी सातबारा काढण्यासाठी पानगाव तलाठी कार्यालयात गेला. मात्र सातबाऱ्यामध्ये जमीन ओलित नसल्याचे नमूद नसल्यामुळे 0.32 हे. आर. जमिनीची रजिस्ट्री होऊ शकत नाही असे अर्जनविस यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदार शेतकरी पुन्हा सातबाऱ्यावर ओलित शेतजमीन असा उल्लेख करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला.

दरम्यान सातबाऱ्यावर ओलित लिहायचे असेल तर 1000 रुपये द्यावे लागतील. असं तलाठी मनोज कोहपरे यांनी शेतकऱ्याला सांगितलं. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचत आरोपी मनोज कोहपरे याला तडजोडी नंतर 800 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या संपूर्ण प्रकारानंतर लाचलुचपत पथकाने संबधित तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

SCROLL FOR NEXT