Gondia ST Bus Accident Update  Saam Tv
महाराष्ट्र

कुटुंबीयांसोबतची ती भेट ठरली शेवटची, शिवशाही बस अपघातात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Police Constable Died In Gondia Accident: अर्जुनी तालुक्यातील कोहमारा – गोंदिया मार्गावर डव्वा – खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत झाल्याची घटना घडली.

Priya More

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे शुक्रवारी शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. स्मिता सूर्यवंशी असं या महिला पोलिसाचे नाव आहे. कुटुंबीयांना भेटून कामासाठी जात असताना स्मिता यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. कुटुंबासोबतची त्यांची ही शेवटची भेट ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी तालुक्यातील कोहमारा – गोंदिया मार्गावर डव्वा – खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत झाल्याची घटना घडली. दुपारी १ वाजेच्यादरम्यान हा अपघात झाला होता. यामध्ये अर्जुनी मोर येथे राहणाऱ्या स्मिता सूर्यवंशी या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सूर्यवंशी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या अपघातात मृत्यू झालेल्या स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलिस विभागातच कार्यरत होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. पतीच्या निधामुळे स्मिता सूर्यवंशी यांना मोठा धक्का बसला होता. आपले सासू- सासरे आणि एका छोट्याशा बाळासह त्या खूपच हालाकीचे जीवन जगत होत्या.

हालाकीचे जीवन जगत असताना स्मिता यांना पोलिस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन ते तीन महिण्यापूर्वी नोकरी मिळाली होती. आपल्या कुटुंबीयांना भेटून स्मिता शुक्रवारी आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरवरुन साकोलीला जात होत्या. त्याचवेळी गोंदिया येथे त्या प्रवास करत असलेल्या शिवशायी बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये स्मिता यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने अर्जुनी मोर शहरांसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT