Gondia Accident: शिवशाही बस अपघातात भंडाऱ्यातील चौघांचा मृत्यू; नातेवाईकांना भेटण्यापूर्वीचं काळानं घातली झडप

Gondia Bus Accident : गोंदिया येथे झालेल्या शिवशाही बस अपघातात भंडाऱ्यातील चार लोकांचा मृत्यू झालाय.
Gondia Bus  Accident
Gondia Bus Accident
Published On

शुभम देशमुख,साम प्रतिनिधी

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात भंडारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन येथील राजेश लांजेवार (३९) आणि त्यांची पत्नी मंगला लांजेवार (३४) आणि साकोली तालुक्यातील चांदोरी उसगाव येथील रामचंद्र कनोजे (६५) आणि त्यांची पत्नी अंजिरा कनोजे (६०) या वृद्ध दांपत्याचा मृतांमध्ये समावेश आहे.

लांजेवार दांपत्य हे त्यांच्या अडीच वर्षीय मुलासह गोंदिया येथील नातेवाईकांची प्रकृती बघण्यासाठी निघाले होते. लांजेवार दांपत्याचा घटनास्थळीस मृत्यू झाला असून अडीच वर्षीय मुलावर गोंदिया येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर, साकोली तालुक्यातील चांदोरी येथील कनोजे दांपत्य हे छत्तीसगडमधील डोंगरगड इथं राहणाऱ्या त्यांच्या मुलीच्या भेटीसाठी निघाले होते. चांदोरी आणि पिंपरी पुनर्वसन इथं या घटनेची माहिती मिळतात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसला अपघात झाला. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटी झाल्याचं सांगितलं जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर या शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 लोक जखमी असल्याची माहिती माहिती मिळाली आहे.

Gondia Bus  Accident
Parbhani Accident: राज्याला हादरवणारी घटना! शिक्षक पती, पत्नी अन् मुलीने रेल्वेखाली झोकून संपवलं जीवन

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसला भीषण अपघात झाला, या अपघातात महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) शिवशाही बस उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झालाय.

Gondia Bus  Accident
Wardha News: रेल्वे रुळावरून जाणाऱ्यांना रेल्वेची धडक, दोघांचा चिरडून मृत्यू

प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका विभाग आणि पोलीस विभागाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com