Gondia news
Gondia news  saam tv
महाराष्ट्र

Gondia News | रस्ता विचारणं पडलं महागात; वृद्ध महिलेचा रस्त्यावरच झाला अपघात

अभिजीत घोरमारे

Gondia News : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव-कामठा रोडवरील कट्टीपार जवळील नवेगाव फाट्यावर एका ट्रकने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. या अपघातने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीराबाई घनश्याम हरिणखेडे असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल हरीणखेडे ( वय 21) ही आपल्या आजी मीराबाई हरिणखेडे सोबत आत्याच्या उमरी (मध्यप्रदेश) या गावावरून स्कुटी या दुचाकीने खुर्सीपारटोला स्वगावी परतत होत्या. मात्र, ते दोघे गावी जायचा रस्ता विसरले. त्यामुळे आमगाव कामठा मार्गावर नवेगाव फाट्याजवळ स्कुटी थांबवून आजी रस्ता विचारण्यासाठी उतरल्या. त्यावेळी आमगावकडून येणाऱ्या एका ट्रकने कोमलच्या आजीला जोरदार धडक दिली. ट्रक चालकाने दिल्यानंतर घटनास्थलावरून फरार झाला. मात्र, मीराबाई या वृद्ध महिलेला जबर धडक दिल्याने मीराबाई जागेवरच ठार झाल्या.

दरम्यान, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. या लोकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करिता आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातानंतर कोमल हरिणखेडे हिच्या तक्रारीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

SCROLL FOR NEXT