Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : आमदार चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश; मोरगाव अर्जुनीत तिरंगी लढत होण्याची शक्यता

Gondia News : गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने मनोहर चंद्रिकापुरे यांनी हा निर्णय घेतला आहे. मनोहर चंद्रिकापूरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केल्याने मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गोंदियाच्या (Gondia News) मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व सूगत चंद्रिकापुरे यांनी अखेर (Bachchu Kadu) बच्चू कडूच्या तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी तयार केली होती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT