Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या

Gondia News : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने संजय नगर येथील ग्रामस्थांचा वन विभागावर रोष व्यक्त करत कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: पहाटेच्या सुमारास घराच्या बाहेर लघुशंका करण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून संजयनगर मधील गावकऱ्यांनी गोठणगाव- केशोरी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच वन विभागावर रोष व्यक्त करत शासकीय वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे सदरची घटना घडली असून वंश प्रकाश मंडल (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. वंश हा आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी घराच्या बाहेर आला. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला. यात त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. 

रास्ता रोको करत वाहनांची तोडफोड 

सदरच्या घटनेनंतर संजय नगर येथील ग्रामस्थांनी मागील ४ तासांपासून गोठणगाव ते केशोरी हा मार्ग ग्रामस्थांनी रोखून धरला आहे. ग्रामस्थांच्या रोष व्यक्त करत शासनाच्या गाड्यांना तोडफोड केली आहे. जोपर्यंत मृतक चिमुकल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वन विभागाकडून मिळत नाही व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पाऊल उचलत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. 

वन विभागावर रोष 

यापूर्वी देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना परिसरात घडल्या होत्या. त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे. यामुळे गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT