Gondia Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Gondia Rain Update: बळीराजा सुखावला; सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

Gondia News : बळीराजा सुखावला; सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: गेल्या २०-२५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गोंदिया जिह्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे (Gondia) पिकांना जीवदान मिळाले आहे. जोरदार पावसाच्या बँटींगने बळीराजा सुखावला आहे. (Tajya Batmya)

राज्यभरात साधारण महिनाभरापासून पाऊस गायब झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागून होत्या. यात हवामान विभागाकडून ६ तारखेपासून पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात सोमवारी पावसाने हजेरी लावली. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे. 

शेतकरी सुखावला 

पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे धान पिकांना नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळा संपत आला असताना देखील मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पिके हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र दोन दिवस जोरदार पाऊस आल्याने धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. प्रशासनाच्यावतीने नदीकाठावरील गावांतील नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधूनही संघाबाहेर; कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?

BJP Congress Alliance: शिंदेंविरोधात भाजप-काँग्रेसची एकी, कोल्हापुरात कुस्तीत दोस्ती

मुंबईसाठी भाजपचा 'MY' फॉर्म्युला, महिला, युवकांची मतं मिळवण्यासाठी रणनीती

Maharashtra Live News Update: आम्ही महापालिका जिंकणारच; उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

SCROLL FOR NEXT