Gondia Medical Collage Saam tv
महाराष्ट्र

Gondia Medical Collage : गोंदिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग; रुग्णालयात नागरिकांची पळापळ

Gondia News : अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किटवर आगीवर नियंत्रण मिळाले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र आगीमुळे रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरातील इलेक्ट्रॉनिक उपक्रम बंद

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सकाळी रुग्णालयात ओपीडी सुरू असताच जवळच शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. शॉर्टसर्किट झाल्याने रुग्णालयात तपासणीसाठी आलेले रुग्ण व नागरिकांनी धावपळ सुरु झाली होती. सुदैवाने रुग्णालयातील मोठी दुर्घटना टळली आहे. 

गोंदिया शहरात असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सकाळी हि घटना घडली आहे. महाविद्यालयामधील केटीएस रुग्णालयात ओपीडी सुरू असताना अचानक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे आग लागली. यानंतर संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. तर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला व उपस्थित रुग्ण व नागरिकांमध्ये घबराट पसरून एकच धावपळ सुरु झाली होती.  

मोठी दुर्घटना टळली 

संपूर्ण रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले व काही वेळासाठी संपूर्ण रुग्णालयात धूळच धूळ झाली. सुदैवाने आग अधिक पसरली नाही. मात्र वेळेवर अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किटवर आगीवर नियंत्रण मिळाले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र आगीमुळे रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरातील इलेक्ट्रॉनिक उपक्रम बंद करण्यात आले. 

रुग्णालयात अलार्म अलर्ट नाही 

दरम्यान शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय असताना याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात कोणताही अलार्म वाजला नाही. या मुळे लोकांची एकच धावपळ उडाली होती. मुळात एवढा मोठा रुग्णालयात असताना या ठिकाणी अलार्म अलर्ट नसल्यामुळे रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आगीमुळे काही मोठी दुर्घटना घडली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता देखील होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain: हार्ट अटॅक अन् जळजळ यातला फरक कसा ओळखायचा? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण लक्षणे

Long Sleeves Blouse Design: मॉडर्न अन् स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे 'फुल स्लिव्ह ब्लाऊज'

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT