Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast : गॅसच्या भडक्याने संसार उघड्यावर; संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळाले

Gondia News : गावातील माधव नेवारे यांच्या घरात गॅसचा भडका उडाल्याने गॅस सिलेंडरला एका बाजूने फट पडली. यामुळे आगीचा भडका अधिक उडाला.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: घरात सकाळी स्वयंपाक केला जात असताना सिलेंडरमधून गॅस लिकेज होऊन गॅसचा भडका उडाला. या भडक्याने क्षणार्धात घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे संसार उघड्यावर आला आहे.  

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी- मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खामखुरा गावात हि घटना घडली आहे. गावातील माधव नेवारे यांच्या घरात गॅसचा भडका उडाल्याने गॅस सिलेंडरला एका बाजूने फट पडली. यामुळे आगीचा भडका अधिक उडाला. यात माधव नेवारे यांचे घर लाकूड व मातीचे असल्याने घराणे क्षणार्धात पेट घेतला. अवघ्या काही मिनिटातच घर पूर्णतः जळून खाक झाले. यात घरातील साहित्य देखील जळले आहे. 

सध्या शेतीचे कामे सुरु असल्याने माधव नेवारे यांनी मजुरांना पैसे देण्याकरिता तसेच धान रोवणी कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडील रोवणीच्या कामाचे ३४ हजार रुपये जमा करून घरी ठेवले होते. तर त्यांच्या मुलाने ७ हजार रुपये जमा करू ठेवलेले होते. असे एकूण ४१ हजार रुपयांची रोकडसह घरातील जीवनाश्क्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घरातील सर्व वस्तू जळाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT