Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : १२ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; १५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Gondia News : रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत असते. यामुळे कृषीसाठी किमान १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: शेतीसाठी वीज पुरवठा करताना महावितरणकडून केवळ ८ तास वीज दिली जाते. यामुळे पिकांना (Gondia) पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचण होत असते. यामुळे कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग रोखला. महार्गावर रास्तारोको (Rasta Roko) केल्यामुळे १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. मात्र महावितरणच्या (Mahavitaran) वतीने फक्त ८ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांचे (Farmer) रब्बी हंगाम संकटात आले आहे. रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत असते. यामुळे कृषीसाठी किमान १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने गोंदियाच्या कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रस्ता रोको करणाऱ्या १५ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सैनिकांच्या मुख्यालयाजवळ २ बॉम्बस्फोट अन् गोळीबार; पाहा VIDEO

Cotton buds in ears: कॉटन बड्सने कान टोकारताय? आताच थांबा, अन्यथा बहिरे व्हाल, वाचा डॉक्टरांनी काय सांगितलं

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Dnyanda Ramtirthkar: गुलाबी थंडीत काव्याचं सौंदर्य खुललं अन् चाहते बघतच बसले...

Winter Lips Care: थंडीत कोरड्या अन् फाटलेल्या ओठांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT