Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : नाराज कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची गाडी धरली रोखून; पोलिसांनी मध्यस्थी करत नेले सभास्थळी

Gondia News : विधानसभा निवडणुकीसाठी मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिकांना उमेदवारी न देता दिलीप बनसोडे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेत काँग्रेसने तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे नाना पटोले यांची गाडी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी रोखून धरली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पटोले यांच्याजवळ प्रचंड रोष व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीसाठी मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) स्थानिकांना उमेदवारी न देता दिलीप बनसोडे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गोंदिया येथे सभेसाठी आले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर (Nana Patole) रोष व्यक्त करत गाडी अडवून धरली होती. बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. 

स्थानिक उमेदवारांनी काय चूक केली? असा सवाल यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारला. अनेक कार्यकर्ते नाना पटोले यांच्या ताफ्यासमोर आडवे झाले होते. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला सारत पोलिसांनी नाना पटोले यांना सभास्थळापर्यंत नेले आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून ते सभास्थळच्या बाहेर थांबून आहेत. यामुळे पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : UPI आणि ATM मधून तुम्ही PF चे किती पैसे काढू शकता? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अभिजीत दीपक यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

थरारक मोहिमेत यश! अवचितगडाच्या दरीतून 400 किलोच्या तोफा बाहेर

नाकात नथ अन् कपाळी टिकली! गौतमी पाटीलचा मराठमोळा अवतार पाहून फॅन्स झाले घायाळ; पाहा सुंदर फोटो

Operation Tiger: मोठी बातमी! ६ टायगर शिंदेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची केंद्रात ताकद वाढली

SCROLL FOR NEXT