Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार ॲक्शन मोडवर; दोन दिवसात ३० लाखाचा दंड

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
 : गौण खनिजाची चोरून वाहतूक केली जात असते. अशा प्रकारे होत असलेल्या गौण खनिज वाहतुकीसाठी आमगाव तहसीलदार ॲक्शन मोडवर असून तालुक्यात २४ तासांसाठी तीन पथकाची नेमणूक केली आहे. या पथकांद्वारे दोन दिवसात झालेल्या कारवाईत जवळपास ३० लाखाच्या दंड वसूल केला आहे. 

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय अवैध गौण खनिज वाहतुकीच्या बाबतीत ॲक्शन मोडवर आले आहे. ज्या दिवशी तहसीलदाराच्या वाहन चालकाला मारहाण झाली; त्यानंतर आमगाव तहसीलदार यांनी तीन पथक तयार करून २४ तासांसाठी तैनात करण्यात आले आहेत. या पथकामध्ये नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांच्या समावेश करून तालुक्यातील ज्या- ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक होते येथे पथकांची नजर आहे. हे पथक २४ तास ७ दिवस कार्यरत राहणार असल्याचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी सांगितले.

रेती, मुरूम, गिट्टी आणि माती अवैध रूपाने वाहतूक केली जाते, अशांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. दोन दिवसात १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमध्ये दहा वाहन विना परवानगी गौण खनिजाची वाहतूक करीत असताना आढळले. त्यांच्यावर जवळपास ३० लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आमगाव तालुक्यातील अवैध वाहतूक गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याता अशा प्रकारची कारवाई गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये व्हावी; अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT