Gondia news  saam tv
महाराष्ट्र

Gondia News : नदी ओलांडणे बेतलं जीवावर; चुमली नदीत व्यक्ती गेला वाहून

चुमली गावात एका व्यक्तीचा नदीतील पाण्याचा प्रवाहात वाहून जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पांलादूर/जमीनदारी येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चुमली गावात धक्कादायक घटना घडली आहे. या गावात एका व्यक्तीचा नदीतील पाण्याचा प्रवाहात वाहून जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Gondia News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, चुमली गावात जाण्यासाठी चुमली नदी ओलांडूनच गावातील नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यात आज एक व्यक्ती आज सकाळच्या सुमारास पालांदूर/जमीनदारीवरून नदी ओलांडून चुमली गावात जात होता. त्यावेळी त्या व्यक्तीचा नदीतील पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोरेश्वर देवाजी सलामे असे ३८ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती चुमली गावात राहणारा आहे. मोरेश्वर हे पालांदूर/जमीनदारीवरून चुमली गावी परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद चिचगड पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे त्यांचा मृतदेह हा विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, देवरी तालुक्यातील पांलादूर/जमीपासून चुमली गावाला जाण्याकरीता रस्ताच नाही. विशेषता चुमली गावात जाण्यासाठी चुमली नदी ओलांडूनच गावातील नागरीकांना अनेक वर्षापासून ये-जा करावे लागत आहे. यामुळे सतत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकांचे जीव या चुमली नदीत गेले आहेत. याचीच दखल घेत काही दिवसा अगोदरच जिल्हाधिकारी व संपूर्ण जिल्हा प्रशासनाने त्या चुमली गावातील नागरीकांशी भेट घेत त्या नदीची पाहणी करत लवकरच नागरीकांना ये -जा करण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT