Gondia: देवाच्या श्रद्धेचे आमिष दाखवून लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
Gondia: देवाच्या श्रद्धेचे आमिष दाखवून लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Gondia: देवाच्या श्रद्धेचे आमिष दाखवून लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

गोंदिया: देवाच्या श्रद्धेचे आमीष दाखवून अर्जुनी येथील महिला व्यापाऱ्याचे सोने लंपास करणाऱ्या पाच आरोपींना गोंदिया Gondia जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलिसांनी Morgaon Police अटक केली आहे. अटक झालेली ही टोळी आंतरराज्यीय Interstate Gang आहे.

हे देखील पहा-

टोळीतील पाचही आरोपींना मध्यप्रदेशच्या Madya Pradesh पांढुरणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना स्थानिक दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी केली आहे. यात टोळीप्रमुख वसीम सिराज अब्बास (वय 37 वर्ष) रा. आंबिवली कल्याण ठाणे, माशाअल्ला नव्वर अली (वय 32 वय) रा. टिटीनगर जि. शहडोल म.प्र. मुक्तारअली पिल्लू अली (वय 38), जितेंद्र गोकुलप्रसाद रॉय (वय 30), गंगाराम नगराम नरबरेय्या (वय 42) तिघेही रा. भोपाल यांना अटक करण्यात आली आहे.

अर्जुनी मोरगाव शहरातील ओजस जनरल स्टोअर्स मध्ये आरोपींनी पुजेचे नाव करत हातचलाखी करून महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जाधव आणि चमूने लगेच दखल घेऊन चोरट्यांच्या तपास सुरू केला.

पोलिसांनी मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आले होते. अखेर इतर ठिकानाच्या सीसीटीव्ही तपासण्यात पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपीच्या अटकेने अनेक गुन्हाच्या खुलासा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे।

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाईंदरमध्ये नाल्यात नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT