Gondia News Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: केमिकलमध्ये ठेवल्‍यास १० हजाराचे होतात अडीच लाख; फसवणूक करून झाले पसार

केमिकलमध्ये ठेवल्‍यास १० हजाराचे होतात अडीच लाख; फसवणूक करून झाले पसार

अभिजीत घोरमारे

गोंदिया : पैशाचा पाऊस पाडणे, झाडाला पैसे लागणे अशा अंधश्रद्धामुळे आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याची घटना नेहमी ऐकले अथवा पाहिले आहे. मात्र चक्क केमिकलमध्ये ठेवल्यास १० हजाराचे अडीच लाख होतात; असे सांगून फसवणूक झाल्‍याचा प्रकार गोंदियात (Gondia) पहायला मिळाला आहे. (Breaking Marathi News)

गोंदिया जिल्‍ह्याच्या रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत विठ्ठल रुख्मिनी मंदिर कोरणीघाट येथे १० हजाराच्या नोटा एका कॅमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटांमधून अडीच लाख रुपये तयार होतात. असा भुलथापा देवून आरोपींनी फिर्यादीकडून १० हजार रुपये उकडल्याची घटना घड़ली आहे. या प्रकरणी ५ आरोपींला रावनवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दिपांशू ब्रिकचंद उरकुडे असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव असून पिंटुकुमार सुंदरलाल बारमाटे (वय ३२, रा. मलाजखंड), दुर्गेश सिताराम मरसकोल्हे (वय ३०, रा. बंजारीटोला), सियाराम महिपाल चौधरी (वय ४२, रा. सतोना), राजेश अमरलाल नेवारे (वय ३०, रा. बालाघाट), विष्णू बाबुलाल पंधरे (वय ४२, रा. पारगाव) असे अटक केलेल्‍या आरोपींचे नाव आहे.

हातात दिले नोटांचे बंडल

रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीतील सातोना येथील फिर्यादी दिपांशु विक्रमचंद उरकुडे यांना काही लोकांनी १० हजार रूपयांचा नोटा एका केमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटामधून अडीच लाख रुपये तयार होतात; अशी बतावणी केली. त्यानंतर फिर्यादीकडून १० हजार रुपये घेऊन एक केमिकल टाकलेले नोटांचे बंडल पॅक करून फिर्यादीला देत २ तासांनी उघडून बघायला सांगितले. २ तासांनी फिर्यादीने सदर बंडल उघडून पाहिले असता त्यात कागदी नोटा दिसून आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nora Fatehi: चुराके दिल मेरा गोरिया चली, नोराचं सुंदर सौंदर्य

Cyber Crime : इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; दहा लाखात ऑनलाईन फसवणूक

Sharad Pawar: सगळ्यांचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका, पवारांचं महायुतीला आव्हान

SCROLL FOR NEXT