Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News : वाद सोडवायला गेलेल्या लिपिकास शिक्षकाकडून मारहाण; लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gondia News : सभा संपल्यानंतर सदर शाळेतील शिक्षक हिरालाल खोब्रागडे (वय ५२) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: भांडणात मध्यस्थी करत वाद सोडविणे एका  लिपिकास महागात पडले. शिक्षक व मुख्याध्यापकात होत असलेला वाद सोडवायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकास शिक्षकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. यात त्या लिपिकाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे घडली. 

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालयात हि घटना घडली आहे. मुकुंद बागडे (वय ६०) असे मृत झालेल्या लिपिकाचे नाव आहे. सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा १५ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सभा संपल्यानंतर सदर शाळेतील शिक्षक हिरालाल खोब्रागडे (वय ५२) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला. यात वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावे; या उद्देशाने मृतकाने मध्यस्थी केली. मात्र, आरोपी शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा (Crime News) प्रयत्न केला. 

शिक्षकाला घेतले ताब्यात 

दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाच्या डोक्यावर तो लाकडी दांडा लागला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सेवानिवृत्त लीपिकाला गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान घटनेची नोंद देवरी (Police) पोलिसांनी घेतली असून आरोपी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

SCROLL FOR NEXT