Gondia Accident News Saam TV
महाराष्ट्र

Gondia Accident News: हृदयद्रावक! भरधाव ट्रकने स्कूटीला उडवलं, दोन वर्षाच्या बाळासमोरच आईने सोडले प्राण

Gondia Accident News: मन्न सुन्न करणारी ही घटना प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यांनी बघितली. आईच्या आठवणीने चिमुकली हमसून हमसून रडत होती. ती आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टीव्ही

Gondia Accident News: दोन वर्षाच्या बाळाला घेऊन आई स्कूटीवरून बाहेरगावी निघाली. चिमुकलीला झोप येऊ नये म्हणून आई तिच्यासोबत गप्पा मारत होती. पहाटची वेळ असल्याने रस्त्यावरही वाहनांची वर्दळ नव्हती. मात्र, अचानक पाठीमागून सुसाट वेगाने ट्रक आला आणि त्याने स्कूटीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने तिच्यासोबत असलेली चिमुकली बचावली. (Latest Marathi News)

चिमुकली तिला उठवत होती. मन्न सुन्न करणारी ही घटना प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यांनी बघितली. आईच्या आठवणीने चिमुकली हमसून हमसून रडत होती. ती आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती.

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील कोहमारा महामार्गावर घडली. पायल लाखनकर (वय २४ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. तिच्यासोबत असलेली दोन वर्षाची चिमुकली देखील अपघातात जखमी झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी या अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना (Police) दिली. पण, पोलीस उशिरा पोहचले.

त्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. महिलेचा मृतदेह गोरेगाव येथील रुग्णालयात पाठवला. जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्येक्षदर्शी सांगत आहेत. बेलगाम ट्रकचालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत पायल लाखनकर ही महिला आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन स्कूटीवरून बाहेरगावी निघाली होती. ती गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मृतक महिला ही गोरेगावकडून कोहमाराकडे जात होती.

भडंगा गावाजवळ ट्रकने मागून जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत पायल हिचा जागीच मृत्यू झाला. तिची 2 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT