नोकरीच्या शोधात (Job Search) असलेल्या आणि कमी शिक्षण असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवी पास असलेल्या तरुणांना बँकेमध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank Of India) विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रकिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत ते ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सेंट्रल बँकेमध्ये फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडर या पदांची भरती केली जाणार आहे. या सर्व पदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी भरती केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ ब्रांचसाठी ही भरती केली जाणार आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तसेच तो स्थानिक जिल्ह्यातील असावा.
अर्ज करण्याची तारीख - अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 17 ऑगस्ट 2023
फॅकल्टी - १ पद
ऑफिस असिस्टंट - १ पद
वॉचमन कम गार्डनर - १ पद
अटेंडर - १ पद
फॅकल्टी - उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- ऑफिस असिस्टंट - या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे.
- वॉचमन कम गार्डनर - या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे.
- अटेंडर - या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे.
- एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
- फॅकल्टी - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- ऑफिस असिस्टंट - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वॉचमन कम गार्डनर - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आठवी उत्तीर्ण असावा.
- अटेंडर - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आठवी उत्तीर्ण असावा.
फॅकल्टी - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 20 हजारांपर्यंत पगार मिळेल.
ऑफिस असिस्टंट - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 12 हजारांपर्यंत पगार मिळेल.
वॉचमन कम गार्डनर - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 6 हजारांपर्यंत पगार मिळेल.
अटेंडर - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 8 हजारांपर्यंत पगार मिळेल.
उमदेवारांनी क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती 444601 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.