sambhaji nagar crime Saam Tv News
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: माणुसकीही मेली...मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसेही केले गायब, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?

Theft from accident victims: शासकीय रुग्णालयात चक्क मृत महिलांच्या अंगावरील सोनं आणि पैसे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना छ्त्रपती संभाजी नगरमध्ये घडलीय.

Bhagyashree Kamble

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. शासकीय रूग्णालयात चक्क मृत महिलेच्या अंगावरील सोनं आणि पैसे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. माणुसकीला काळीमा फासणारी या घटनेमुळे गंगापूर हादरलं असून, या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तातडीने दखल घेत, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हैद्राबाद येथील काही भाविक घृष्णेश्वराचं दर्शन करुन शिर्डीला परतत होते. मात्र गंगापुरजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला. गंगापुरजवळ भाविकांची जीप उसाच्या ट्रकला धडकली. यात ४ जणांचा मृत्यू आणि ११ भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णवाहिकेनं मृतदेह आणि जखमींना गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र, याच दरम्यान त्यांच्या अंगावरील सोनं गहाळ झाल्याचा प्रकार समोर आलाय.

ज्यावेळी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली, तेव्हा त्यात अपघातग्रस्त आणि मृतदेह रुग्णवाहिकेत टाकण्यात आले. त्यावेळी रुग्णांच्या अंगावर सोनं असल्याची माहिती आहे. तसेच काही पैसे देखील होते. रुग्णवाहिका मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहचली. तेव्हा त्यातील एका मृत महिलेच्या अंगावरील सोनं चोरीला गेल्याची माहिती समोर आली. हे पाहून मृत महिलेच्या नातेवाईकांना धक्काच बसला.

या धक्कादायक घटनेनंतर गंगापूर पोलिसांना या संदर्भातली माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अपघात कसा घडला?

हैद्राबादच्या भाविकांचा गंगापूर वैजापूर महामार्गावरील तांबोळगोटा फाट्यावर भीषण अपघात घडला. घृष्णेश्वराचं दर्शन करुन भाविक शिर्डीला परतत असताना हा अपघात घडला. भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकली. ज्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू तर ११ जण जखमी असल्याची माहिती आहे. यात प्रेमलता श्यामशेट्टी, प्रसन्न लक्ष्मी, वैद्विक श्यामशेट्टी, अक्षिता श्यामशेट्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT