Love triangle: 'तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होणार नाही', प्रेमाच्या त्रिकुटात तरूणानं केलं भयंकर कृत्य

Delhi crime news: दिल्लीतील बवाना परिसरात लव्ह ट्रायंगलमुळे तरूणावर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. ८ जानेवारीला अज्ञात हल्लेखोरांनी प्रकाश नावाच्या तरूणावर अॅसिड हल्ला करत पळ काढला आहे.
प्रेमाच्या त्रिकुटात तरूणानं केलं भयंकर कृत्य
Delhi crime newsSaam tv
Published On

दिल्लीतील बवाना परिसरात लव्ह ट्रायंगलमुळे तरूणावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना ८ जानेवारीला घडली असून, बवाना परिसरातील शिवशंकर गल्लीत अज्ञात हल्लेखोरांनी तरूणावर अॅसिड हल्ला करत पळ काढलाय. पीडित तरूणाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केलीय. पीडित व्यक्ती प्रकाशवर अॅसिड हल्ला झाला होता. त्याच्यावर ज्या ठिकाणी अॅसिड हल्ला झाला, त्या ठिकाणचे १०० कॅमेरा फुटेज तपासण्यात आले. तपासणी केल्यानंतर पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हा तरूण या घटनेचा सुत्रधार होता.

प्रेमाच्या त्रिकुटात तरूणानं केलं भयंकर कृत्य
Nagpur Crime News: उपचाराच्या नावाखाली ५० तरूणींवर लैंगिक अत्याचार, मानसोपचार तज्ज्ञावर चौथा गुन्हा दाखल

आरोपी आणि पीडितेचा एकाच मुलीवर प्रेम

आरोपी मुकेशची चौकशी केली असता, हे संपूर्ण प्रकरण लव्ह ट्रायंगलमधून घडली असल्याची माहिती आहे. खरंतर आरोपी आणि पीडितेचे एकाच मुलीवर प्रेम होते. यावरून वर्षभरापूर्वी मुकेश आणि पीडित व्यक्तीमध्ये भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर बदला घेण्यासाठी मुकेशने दोन मित्रांना घेऊन प्रकाशचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. आधी मुकेश आणि त्याचे २ मित्र चारचाकी गाडीतून आले. नंतर प्रकाश याच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला केला. नंतर आरोपीने पलायन केले.

प्रेमाच्या त्रिकुटात तरूणानं केलं भयंकर कृत्य
Indian Railways: रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! विना रिझर्व्हेशन प्रवास करा, कधी आणि कोणत्या ट्रेन धावणार?

प्रकाश याच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला झाल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नंतर तपास करीत आरोपीसह कार देखील ताब्यात घेतली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने, 'ती माझी होऊ शकली नाही तर कुणाचीही होऊ शकणार नाही'. असं म्हणत त्याने हे भयंकर कृत्य केल्याचं कबूल केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com