Gold Rates Today News  AI Image
महाराष्ट्र

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; सुवर्णनगरीत १ तोळ्याची किंमत किती?

Maharashtra Jalgaon Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १,५०० रुपयांनी, तर चांदीचा दर ४ हजार रुपयांनी कमी झाला.

Alisha Khedekar

  • जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण.

  • सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपयांची घट.

  • चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण.

  • २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर १ लाख ३० हजार ५०० रुपये.

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सुवर्ण बाजारात आज बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याने सराफा बाजारात चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. दररोज किमती कमी होत असल्याने ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील बदलांकडे लागले आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे खरेदीसाठी योग्य वेळ कोणती, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही ग्राहक दर आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत, तर काहींनी सध्याच्या घसरलेल्या दरातच सोने खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घट झाल्याने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. आज जळगाव सुवर्ण बाजारातील सोन्या-चांदीचे दर पाहता, २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजार ५०० रुपये नोंदवण्यात आला आहे. तर चांदीचा दर १ लाख ६५ हजार रुपये आहे.

दरम्यान, बाजारातील दरांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी ताजे दर तपासून घेणे आवश्यक आहे. आगामी दिवसांत सोन्या-चांदीच्या किमती कोणत्या दिशेने जातात, याकडे आता ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचेही लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Insurance Check: वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपयांचा दंड

Nachnichi Ambil Recipe : कोकण स्पेशल नाचणीची आंबील कधी प्यायलात का? चवही भन्नाट, फायदेही अनेक; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: साताऱ्यात पार्सल ऑफिसमधील दोन कामगारांकडूनच २० मोबाईलची चोरी; ८ तासांत पोलिसांनी आरोपींना केली अटक

Vivah Muhurta 2026: यंदा कर्तव्य आहे! नोव्हेंबरमध्ये उडवा लग्नाचा बार, जाणून लग्नाचे शुभ मुर्हूत

Pune FDA Action: तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात मोठी कारवाई, हॉटेलनंतर थेट खाऊ गल्लीवर छापा, 8 दुकानं सील

SCROLL FOR NEXT