Shreya Maskar
कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये नाचणीच्या आंबळीला विशेष महत्त्व आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर असते.
नाचणीची आंबील बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, पाणी, ताक, चवीनुसार मीठ, जिरे पूड, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले इत्यादी साहित्य लागते.
नाचणीची आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या. त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत असे मिश्रण तयार करा.
एका पातेल्यात उरलेले पाणी गरम करा. त्यात नाचणीचे तयार केलेले मिश्रण घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. आता त्यात ताक, मीठ, जिरेपूड, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
चवीनुसार पाणी घालून आंबील पातळ करा. अशाप्रकारे कोकणातील पारंपरिक नाचणीची आंबील तयार झाले आहे.
नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. नाचणीमधील कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात.
नाचणीतील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. ताक घालून तयार केलेली आंबील थंडगार पेय म्हणून घेता येते.