Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Jalgaon Sarafa Market Gold - Silver Price:जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. १ तोळा सोनं ५०० रुपयांनी स्वस्त झालं तर चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही.

Priya More
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण

  • चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही

  • सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात आठवडाभरापासून सोनं - चांदीच्‍या भावात सातत्‍याने चढ- उतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारात होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात मागील काही महिन्‍यांपासून सातत्याने चढ- उतार होत आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५१,५०० रुपये खर्च करावे लागतील. गुरूवारी २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५१,००० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४६० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३८,७७५ रुपये खर्च करावा लागत आहे. गुरूवारी २२ कॅरेटच्या १ तोळा सोनं खरेदीसाठी १,३८,३१५ रुपये खर्च करावा लागला होता. दरम्यान चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. १ किलो चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,३४,००० रुपये खर्च करावे लागतील.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५४,५८० रुपये द्यावा लागणार आहेत. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचा दर १५,४५,८०० रुपये झाला आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांची वाढ झाली. हे सोनं १,४१,७०० रुपयांना विकले जात आहे. तर १० तोळा सोनं १४,१७,००० रुपये झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT