Gold- Silver Price Drop meta ai
महाराष्ट्र

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळा ७०,००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Jalgaon Gold-Silver Price: जळगावच्या सराफा बाजारात आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापासून सोनं-चांदीचे तर कमी होत आहेत.

Priya More

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून सोनं-चांदी स्वस्त होत आहे. आजही जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज १ तोळा सोनं ७००० रुपयांनी तर १ किलो चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त झाली. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

सोनं- चांदीच्‍या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. या आठवड्याच्‍या सुरूवातीपासूनच सोने आणि चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी होत आहेत. सातत्‍याने होत असलेली घसरण आज देखील कायम राहिली. आज १ तोळा सोनं ७००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना विनाजीएसटी १ लाख २३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.

तर १० तोळा सोनं ७०,००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १२ लाख ३० हजार रुपये खर्च करावे लागतील. आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. १ किलो चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त झाली असून ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांना विनाजीएसटी १ लाख ५१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

आठवडाभरातील १ तोळा सोन्याचे विनाजीएसटी दर किती?

१४ नोव्‍हेंबर- १ लाख ३६ हजार ५०० रुपये

१५ नोव्‍हेंबर - १ लाख ३६ हजार ७०० रुपये

१६ नोव्‍हेंबर- १ लाख ३५ हजार रुपये

१७ नोव्‍हेंबर - १ लाख ३४ हजार ५०० रुपये

१८ नोव्‍हेंबर- १ लाख ३२ हजार रुपये

१९ नोव्‍हेंबर - १ लाख ३० हजार ५०० रुपये

२० नोव्‍हेंबर - १ लाख २३ हजार रुपये

आठवडाभरातील १ किलो चांदीचे विनाजीएसटी दर किती?

१४ नोव्‍हेंबर- १ लाख ८० हजार रुपये

१५ नोव्‍हेंबर- १ लाख ८० हजार रुपये

१६ नोव्‍हेंबर - १ लाख ७३ हजार रुपये

१७ नोव्‍हेंबर - १ लाख ७२ हजार रुपये

१८ नोव्‍हेंबर - १ लाख ६९ हजार रुपये

१९ नोव्‍हेंबर - १ लाख ६५ हजार रुपये

२० नोव्‍हेंबर - १ लाख ५१ हजार रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी आणि क्लास चालकांसाठी महत्वाची बातमी

Winter Skin care : महागड्या क्रीमला विसरा! हिवाळ्यात चेहऱ्याचा कोरडेपणा घालवण्यासाठी घरच्या घरी बनवा ही खास पेस्ट

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडच्या मैदानावर 32 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने रचला इतिहास!

MHADA Lottery: नाशिकमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, प्राईम लोकेशनवर घ्या म्हाडाचे घर; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

तांदळाचे पाणी झाडांवर घालू शकतो का?

SCROLL FOR NEXT