Jalgaon Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

Jalgaon Gold- Silver Price Today: जळगावमध्ये सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. खरेदीपूर्वी वाचा दर किती?

Priya More
  • जळगावमध्ये आज सोन्याच्या दरात मोठा बदल

  • सोन्याच्या दर घसरणीला लागला ब्रेक

  • आज २४ कॅरेटचं एक तोळा सोनं १००० रुपयांनी वाढले

  • १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत होती. पण आज या घसरणीला ब्रेक लागला. जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवड्यापासून सोनं आणि चांदीच्‍या दरात सातत्‍याने घसरण सुरू होती. पण ३ दिवसांपासून स्थिर असलेल्‍या चांदीच्‍या दराने आज चांगलीच उसळी घेतली. तसेच सोन्‍याच्‍या दरात देखील आज मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची वाढ झाली. तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली. आज सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं- चांदीच्या बाजारात होतो. यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही महिन्‍यांपासून स्थिरता पाहायला मिळत नाही. दरम्‍यान मागील आठवड्याच्‍या सुरुवातीपासूनच सोनं-चांदीचे दर सातत्‍याने कमी होत असल्‍याचे दिसून येत हेाते. मात्र आठवडाभर कमी होत असलेल्‍या दरात आज मोठी वाढ झाली. त्यामुळे आज जळगावच्या सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली.

सोमवारी १ तोळा सोन्याचे दर विनाजीएसटी १ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर होते. या सोन्याच्या दरात आज १००० रूपयांची वाढ होऊन हे सोनं १ लाख ५२ हजार ५०० रुपयांवर आले आहे. तर मागील ३ ते ४ दिवसांपाासून स्‍थिर असलेल्‍या चांदीच्‍या दरात आज तब्बल ३००० रूपयांची वाढ झाली. यामुळे १ किलो चांदीचे विनाजीएसटी दर २ लाख ३६ हजार रुपयांवरून २ लाख ३९ हजार रूपयांवर आले आहेत.

१ तोळा सोन्याचे विना जीएसटी दर किती?

३ सप्‍टेंबर - १ लाख ५३ हजार ५००

४ सप्‍टेंबर - १ लाख ५३ हजार ५००

५ सप्‍टेंबर - १ लाख ५२ हजार ५००

६ सप्‍टेंबर - १ लाख ५२ हजार

७ सप्‍टेंबर - १ लाख ५१ हजार ५००

८ सप्‍टेंबर - १ लाख ५२ हजार ५००

१ किलो चांदीचे विना जीएसटी दर किती?

३ सप्‍टेंबर - २ लाख ३८ हजार

४ सप्‍टेंबर - २ लाख ३८ हजार

५ सप्‍टेंबर - २ लाख ३६ हजार

६ सप्‍टेंबर - २ लाख ३६ हजार

७ सप्‍टेंबर - २ लाख ३६ हजार

८ सप्‍टेंबर - २ लाख ३९ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mustard Oil vs Sunflower Oil: मोहरीचे तेल की सूर्यफूल तेल? स्वयंपाकासाठी कोणते तेल अधिक फायदेशीर, जाणून घ्या दोघांमधील फरक आणि फायदे

Maharashtra News Live Update: वाशिमच्या बोरगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक

राहुल गांधींना हायकोर्टाचा जोरदार झटका; मोदींबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीची तक्रार रद्द करण्यास नकार

Latest Mangalsutra Designs: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्राचे 7 लेटेस्ट डिझाईन्स; दिसतील ट्रेंडी आणि एलिगंट

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने 'या' ठिकाणी घेतली ३.९ एकर जमीन; स्टॅम्प ड्युटीच तब्बल ₹४.२० कोटींची!

SCROLL FOR NEXT