Gold Silver Rate  Saam TV marathi
महाराष्ट्र

Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याला चकाकी, १० तोळा सोनं ११००० रुपयांनी महागलं; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold Silver Price Hike In Jalgaon Sarafa Market: अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १० तोळा सोनं ११००० रुपयांनी तर १ किलो चांदी ७००० रुपयांनी महागली. जळगावच्या सुवर्णनगरीत आजचे दर किती घ्या जाणून....

Priya More

Summary -

  • अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • १० तोळा सोनं ११,००० रुपयांनी महागलं

  • चांदीच्या दरातही ७,००० रुपयांची वाढ

  • सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिक नाराज

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे सोनं खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल असतो. अशातच आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. १० तोळा सोनं ११००० रुपयांनी महाग झालं आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ७००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५७ हजार ३८४ रुपयांवर पोहचले आहेत. विना जीएसटी सोन्याचे दर १ लाख ५२ हजार ८०० रुपये इतके आहे. तर आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ११००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह १५ लाख ७३ हजार ८४० रुपये खर्च करावे लागतील.

तर आज जळगावच्या सराफा बाजात चांदीच्या दराने देखील नवा उच्चांक गाठला आहे. १ तोळा चांदीच्या दरामध्ये तब्बल ७ हजारांनी वाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीचे दर २ लाख ६७ हजार ८०० रुपयांवर गेले आहेत. तर विना जीएसटीसह चांदीचे दर २ लाख ६० हजार रुपये इतके आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. पण उद्या अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होईल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT