Gold Price Today: Saam Tv
महाराष्ट्र

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold -Silver Price In jalgaon Sarafa Market: जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Priya More
  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा दर १ लाख ४४ हजारांवर पोहचला

  • १ किलो चांदीच्या दरात २००० रुपयांची वाढ

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये २ हजारांची वाढ झाली आहे. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल पाहायला मिळाला. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १००० रुपयांनी वाढून त्याचे दर १ लाख ४४ हजार रुपयांवर पोहचले आहे. १० तोळे सोन्याच्या दरामध्ये १०००० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १४ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी वाढ झाली असून चांदीचे दर २ लाख २७ हजार रुपयांवर गेले आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९३० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी १,४५,८६० रुपये खर्च करावे लागतली. तर १० तोळा सोन्याच्या दराममध्ये ९३०० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी १४,५३,६०० रुपये खर्च करावे लागतली.

तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी १,३३,७०० रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५०० रुपयांची वाढ झाली असून ते खरेदीसाठी १३,३७,००० रुपये खर्चे करावे लागतील. तर आज चांदीचे दर स्थिर आहेत. १ किलो चांदी २,४०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT