Beed Police विनोद जिरे
महाराष्ट्र

धूमस्टाइलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या प्रकरणात बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हाही दाखल झाला होता.

विनोद जिरे

बीड - बीड पोलिसांनी (Beed Police) धूमस्टाइलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल 1600 किमी पाठलाग करत आंतरराज्य गुन्हेगारांची 4 आरोपींची टोळी पकडली असून त्यांच्याकडून 27 गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे.

बीड शहरातील स्वराज्यनगर भागात रस्त्याने पायी जाणार शिक्षिकेच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे गंठण धूमस्टाइल चोरट्यांनी हिसका मारुन पळवून नेल्याची घटना 23 मार्च रोजी भरदुपारी 12 वाजता घडली होती. या प्रकरणात बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हाही दाखल झाला होता.

नंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेत तब्बल 1600 किमीचा पाठलाग करत मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या चोरट्यांची टोळी पुणे शहरातून अटक केली आहे. या टोळीने 27 गुन्ह्यांची कबूली दिली आहे. महाराष्ट्र राज्यासह गोव्यातही या टोळीने गुन्हे केले असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

शिक्षिका सत्यवती मोराळे या 23 मार्च रोजी शाळेतून रिक्षाने स्वराज्यनगर आपल्या घराकडे जाणाऱ्या वळणावर उतरल्या होत्या. तेथून त्या पायी घराकडे जात होत्या. घर अवघे 200 मीटरवर असताना, समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे 66 हजार रुपये किमतीचे गंठण ओरबाडून धूम ठोकली होती. सत्यवती मोराळे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला , पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धती या आधारे तपास केला. यात त्यांना यश आले अन 27 मार्च रोजी सोनसाखळी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना, पुणे शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

यादरम्यान आरोपींची गुन्हे शाखेने कसून चौकशी करण्यात आली. मात्र सुरुवातीला आडेवेडे घेणाऱ्या या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी बीड जिल्ह्यासह पुणे , ठाणे , गोवा, सोलापूर , मुंबई शहर, परभणी, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी मनमाड तर एक पुणे आणि एक उल्हासनगर येथील असून अनेक दिवसांपासून हे अशाच पद्धतीने गुन्हे करत होते.

या टोळीने बीडच्या शिवाजीनगर ठाणे हद्दीत 4 तर अंबाजोगाई हद्दीत 1 असे 5 गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून या गुन्ह्यातील चोरीला गेलेले दागिने परत मिळवले जातील. असे प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT