Gokul Milk Union News saam tv
महाराष्ट्र

'गोकुळ'मध्ये महायुतीचं सरकारी बहुमत; शासनाचे 4 सदस्य नेमण्यास मंजुरी

Gokul Politics: गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. सरकारच्या निर्णयानं महायुतीची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. तर महायुतीच्या खेळीविरोधात सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलीये. महायुतीनं गोकुळचं सत्ता समीकरण कसं फिरवलंय?... आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी काय रणनीती आखलीये?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावरील अध्यक्ष निवडीतील सत्ता समीकरणे बदलणार आहेत. गोकुळच्या निवडणुकीत बहुमत मिळवूनही समविचारी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीनं मोठा डाव टाकलाय. गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुती सरकारनं थेट सहकार कायद्यात बदल केल्यानं समविचारी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. या बदलाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे आता गोकुळवर शासनाचे चार सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सतेज पाटलांनी दिलाय.

इतकंच नव्हे तर लोकशाही विरोधी मार्गानं गोकुळवर ताबा मिळवून गुजरातला विकण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेसेननं केलाय. मात्र, विरोधकांच्या आरोपांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय...

या निर्णयामुळे 2 हजार कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या गोकुळवर महायुतीच्या

सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे...सत्तेचं गणित कसं बदलणार ते पाहूयात.

समविचारी आघाडी - 13

महायुती - 12

शासन नियुक्त - 4

बहुमताचा आकडा - 14

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीनं सत्ताधाऱ्यांचा पराभव केला होता. मात्र, हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता त्यासाठी थेट कायद्यात बदल करून सतेज पाटलांना महायुतीनं शह दिलाय. मात्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात सतेज पाटील काय रणनीती आखणार? योग्य वेळेची वाट पाहणार की वाद थेट कोर्टात जाणार याची उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palm Itching Meaning For Men And Women: स्त्रियांच्या तळहाताला खाज सुटली की पैसा मिळतो तर, पुरूषांबाबत शुभ की अशुभ?

दिवाळीनंतर राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीचे सर्व आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

शिंदेसेनेत फूट पडणार? शिंदेसेनेतील आणखी दोन शिंदे कोण?

राष्ट्रवादीची महायुतीत कोंडी? आमदारांना मिळेना निधी, पराभवाची भीती? सुनेत्रा पवारांसमोर आमदारांची कैफियत

बदलीनंतर FDA चं काय होणार? मिशन थांबणार? स्वतः तुकाराम मुंढेंनीच दिलं उत्तर|VIDEO

SCROLL FOR NEXT