Gokul Milk Rate Hike
Gokul Milk Rate Hike Saam Tv
महाराष्ट्र

Gokul Milk Rate Hike : मोठी बातमी! गोकुळच्या दूध दरात वाढ, गायीचं दूध किती महागलं? वाचा…

Siddhi Hande

सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. महागाई वाढल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. अशातच गायीच्या दुधात वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या गायीच्या दुधात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दूधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

याआधी गोकुळचे गायीचे दूध ५४ रुपये प्रति लिटर मिळत होते. हे दूध आता ५६ रुपये झाले आहे. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या व्यापारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपासून गोकूळची दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात ४० हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.परंतु दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दूधाला ३५ रुपये दर घोषित करण्यात आले आहेत.दूध उत्पादन संदर्भात महसूल मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात ही घोषणा केली आहे.

दूधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते.त्यानंतर सरकारने ३५ रुपयांना भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३० रुपये स्थायी भाव तर ५ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.१ जुलैपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

दूधाचे भाव

सध्या खुले दूध बाजारभाव ९० रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध १ लिटर ७२ रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध ७६ रुपये तर अमूल दूध ६८ रुपयांना विकले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर ४० रुपये व्हावे, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर दूधाचे दर ३५ रुपये करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

Amravati News: संतापजनक! अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, ४ आरोपींना अटक

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

Sambhajinagar News : मोठी बातमी! शिवसेना गटातील आमदाराच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT