milk rate hike Saam tv
महाराष्ट्र

गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना मोठा फटका, आता किती रुपयांनी दूध महागणार?

milk rate hike : कोल्हापुरातील गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

Vishal Gangurde

गोकूळ दूध महासंघाकडून दूध दरवाढ जाहीर करण्यात आलीये

म्हैस दुधाच्या खरेदी दरात १ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

गाईच्या दुधात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. गोकूळ दूध महासंघाकडून दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकूळने म्हैस दूध खरेदी एक रुपये तर गाय दूध खरेदीमध्ये २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. गोकूळच्या निर्णयाने उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळपासून नवे दर लागू होणार आहेत.

गोकुळ दूध महासंघाकडून म्हैस आणि गाईच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी ५२ रुपये ५० पैशांनी खरेदी होणारे दूध आता ५३ रुपये ५० पैशांनी खरेदी केले जाणार आहे. गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी ३४ रुपयांनी खरेदी होणारे गायीचे दूध आता ३६ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले जाणार आहे.

तत्पूर्वी, खरेदी दरवाढीसोबतच विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ६८ रुपयांनी विकले जाणारे दूध आता ७० रुपये प्रतिलिटर दराने ग्राहकांना मिळणार आहे. हा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आज शुक्रवारी संध्याकाळपासून हे नवे दर लागू होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात असले, तरी सर्वसामान्य ग्राहकांना मात्र वाढीव दरांचा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

SCROLL FOR NEXT