GOKUL ELECTION CONTROVERSY saam tv
महाराष्ट्र

गोकुळसाठी यल्लमादेवीची शपथ, देवीचा धाक दाखवून मिळणार सत्ता? मंत्र्यांनी मोडला अंधश्रद्धा निर्मुलन कायदा?

Gokul Dairy Election: आतापर्यंत देशात निवडणुका आल्या की, मतदारांना भुलवण्याचे आमिष दाखवून आपल्या बाजूला वळवण्याचे अनेक प्रयत्न आपण पाहिलेत. पण आता देवीची शपथ घालून मतदारांना घाबरवण्यात आलंय. होय.. देवीची शपथ घेऊन मत द्या असं बोलण्याची वेळ मंत्र्यांवर का आली ? पाहा खास रिपोर्ट

Snehil Shivaji

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या गोकूळच्या सत्तेसाठी आता थेट यल्लमा देवीचा धाक दाखवण्यात आलाय. होय. 30 वर्ष असलेली सत्ता 2021 मध्ये गेल्यानंतर ती सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदाच महायुतीत ही निवडणूक लढवायची ठरवलीय.. पण तरीही दगाफटका होईल या भितीनं सत्ताधाऱ्यांनी आता सौंदतीच्या यल्लमा देवीची मतदारांना शपथ घातली फक्त शपथच नाही तर देवीच्या कोपाचा धाकही भरलाय. पाहा, राज्याचे मंत्री हसन मुश्रीम मतदारांना कसा देवीचा धाक दाखवतायेत.

ऐकलंत. कशा पद्धतीनं देवीची शपथ आणि शपथ मोडल्यावर देवीच्या प्रकोपाचा धाक खुद्द मंत्र्यांनी दाखवलाय. मतदारांना देवीचा धाक दाखवून भंडाऱ्यावर हात ठेवून शपथ घेण्यास भाग पाडून दबाव आणला जात असल्याचं हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता याप्रकरणी बेळगाव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आलीय. याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी होतेय.

आतापर्यंत निवडणूकीत पैसे, साड्या, मौल्यवान वस्तूंची प्रलोभनं मतदारांना दिली जात होती. पण आता तर थेट देवीची शपथ आणि देवीचा धाक दाखवून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचं दिसलंय. कारण विषय साधा नाही. गोकूळ हा राज्यातील सहकार क्षेत्रातील वार्षिक उलाढालीचा महामेरू आहे. ५ लाखाहून अधिक दूध उत्पादक शेतकरी, ४ हजार 185 कोटींची वार्षिक उलाढाल एकट्या गोकूळची... त्यामुळे या गोकूळसाठी सत्ताधारी फक्त महायुती करुनच थांबलेले नाही तर थेट देवीची भिती दाखवून मतदारांना आपल्या बाजून वळवण्यासाठी धडपडत असल्याचंही दिसलंय.

त्यामुळे पुरोगामी राज्याच्या नावाखाली याच सत्ताधाऱ्यांनी कितीही अंधश्रद्धा निर्मलूनसारखे कायदे केले तरी सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर देव-धर्माचाही बाजार कसा मांडला जातो हेच दिसून आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवारांना काँग्रेसची साथ, ठाकरेसेना नाराज? शिंदेसेना-राष्ट्रवादीत समेट, शिंदेसेनेतच फाटफूट

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

SCROLL FOR NEXT