Gokul Dairy milk price hike latest news saam tv
महाराष्ट्र

'गोकुळ' निकालानंतर पहिलाच मोठा निर्णय घेणार; नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्पष्ट संकेत, म्हणाले, सतेज पाटलांनाही फोन करणार

Gokul Dairy Milk Price Hike Latest News: गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात दूध दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सतेज पाटील यांना फोन करून आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

रणजित माजगांवकर, साम टीव्ही

गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादकांना पुढील आठवड्यात दूध दरवाढीची गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील दूध वितरकांशी चर्चा करून दूध दरवाढीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील यांनी दिली आहे. याबाबत आज संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच मागील सहा महिन्यांत दूध संघाला झालेल्या तोट्याची कारणे शोधून मार्चपर्यंत हा तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यासाठी कार्यकारी संचालकांना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमूल आणि मदर डेअरीने दूध दरवाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळकडूनही दरवाढीची चाचपणी सुरू आहे. दूध उत्पादक आणि ग्राहक या दोघांचेही हित लक्षात घेऊन सर्व संचालकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असं राजेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन करून त्यांचे आभार मानणार - राजेश पाटील

गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालक मंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीला सर्व २५ संचालक उपस्थित राहिल्याने संघाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, बैठकीला सर्व संचालकांनी उपस्थिती लावल्याबद्दल काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन करून त्यांचे आभार मानणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले.

गोकुळच्या वार्षिक सभेला एक महिना मुदतवाढ मिळण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याने मुदतवाढ मागण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर एक महिन्याची मुदतवाढ मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गोकुळच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदाराच्या पुतण्याला अटक, ३ कोटींच्या अलिशान कारने दुचाकीला चिरडले

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतुक कोंडी

ABVP च्या नेत्यासह चौघांना अटक, हॉटेलवर नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अमित शाह पुणे दौऱ्यावर पण मुरलीधर मोहोळांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित, राष्ट्रवादीला झुकते माप?

GenZ Trends : कौतुक करायचंय? मग ‘सुंदर’ म्हणू नका! Gen Z च्या नव्या शब्दाचा अर्थ ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT