shivendraraje bhosale and sunil rane felicitated in girni kamgar melava held at satara saam tv
महाराष्ट्र

Girni Kamgar Melava: गिरणी कामगारांसाठी शिवेंद्रराजेंचा ॲक्शनप्लान, ठाकरेंकडून फसगत : आमदार सुनील राणे

व्यासपीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती.

Siddharth Latkar

Shivendrasinhraje Bhosale News :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी गिरणी कामगारांची (girni kamgar) फसगत केली. ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी ख-या अर्थाने गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात गिरणी कामगारांना पुण्यात घरे देण्याचा मनाेदय मुख्यमंत्री शिंदे यांचा असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सातारा (satara news) नमूद केले. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगार व गिरणी कामगार वारसांची (हक्काची घरे मिळणेसाठी) पात्रता निश्चिती करण्यासाठी आज (मंगळवार) सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास शेकडाे गिरणी कामगार उपस्थित हाेते. व्यासपीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती.

आमदार सुनील राणे यांनी गिरीणी कामगारांचा घरासाठी अद्याप संघर्ष सुरु असल्याचे सांगत खटाव मिल या मिलमधील देखील कामगारांना घरे मिळाली नाहीत. परंतु तेथे आज माेठं माेठे टाॅवर्स उभे राहिले. सचिन अहिर यांनी गिरीणी कामगरांची वाट लावल्याचा आराेप आमदार राणेंनी केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी गिरीणी कामगारांकडे दुर्लक्ष केले. महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महायुतीचे सरकार आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गिरीणी कामगारांची पात्रता निश्चित न झाल्याने अद्याप पाच हजार घरे आपल्या प्रतिक्षेत आहेत. अडीच वर्षात ज्यांच्या घरासमाेर म्हाडा आहे. परंतु एकाही गिरीणी कामगारांना ठाकरेंनी घराच्या चाव्या दिल्या नाहीत, मराठी माणसांना त्यांनी दगा दिला अशी खंत आमदार राणेंनी व्यक्त केली. गत पाच महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुमारे 1600 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या प्रदान केल्याची माहिती आमदार सुनील राणेंनी दिली.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहाेत. गिरीणी कामगारांनी काेणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. काेणी एजंटगिरी करीत असेल तर आम्हांला कळवा असे आवाहन शिवेंद्रसिंहराजेंनी केले.

ते म्हणाले गिरीणी कामगारांना पुणे, सातारा अथवा काेल्हापूर येथे देखील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी सरकार विचारधीन आहे. ज्यांना जिथे घर हवे आहे तेथे ते घेऊ शकतील असेही राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT