Buldhana Crime News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Crime News: तोंडाला स्कार्फ बांधून थेट बारमध्ये घुसली अन्... तरुणीचं कृत्य CCTVत कैद

Buldhana News: छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील तुषार वाईन बारमधून ३४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास झाली

Ruchika Jadhav

Buldhana Theft In Bar:

चोरीच्या अनेक घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील. अनेक जण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करतात. तर काही जण कामाचा कंटाळा करून लोकांचे खिसे कापतात. खिसे कापण्यात चलाख असलेल्या चोरांच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील मात्र बारमध्ये घुसून एका तरुणीने चोरी केल्याचं ऐकलंय का? (Latest Marathi News)

बुलढाण्यात अशीच एक चकित करणारी घटना घडली आहे. जिल्ह्यात महिला चोरांचा देखील सुळसुळाट पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील तुषार वाईन बारमधून ३४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास झाली होती. पैसे चोरीला गेल्याने बारमध्ये खळबळ उडाली.

पैसे नेमके कोणी चोरी केले असा प्रश्न सर्वांना पडला. पुढे बार व्यवसायिकाने आपल्या बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. बारमध्ये चोरी झालीये म्हटल्यावर कोणत्यातरी व्यक्तीनेच चोरी केली असावी असा सर्वांचा समज होता. मात्र सीसीटीव्ही पाहिल्यावर सर्वच अवाक झाले. कारण तोंडाला स्कार्फ बांधून एका मुलीने ही चोरी केली आहे.

तसेच बारच्या बाहेरील सिसीटिव्ही पाहिले असता अनोळखी महिला आणि पुरुष चेंबरवरील लोखंडी झाकण चोरून नेताना दिसले. याबाबत बार मालकाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुध्द कलम ३८०, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT