Navi Mumbai Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : वडिलांच्या मित्रानेच केला घात; 50 रुपयांचे आमीष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Chhatrapati Sambhajinagar Crime News : पीडितेला त्रास सुरु झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये माणुसकीचा काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या मित्राने 50 रुपयांचे आमिष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पीडितेला त्रास सुरु झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख असे आरोपीचे नाव आहे. (Crime News)

आरोपीने कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी पीडित मुलीला दिली होती. भीतीपोटी मुलीने घरात काही सांगितले नाही. मात्र, तिला त्रास होत असल्याने चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारले असता, वडिलांच्या मित्रानेच 50 रुपये देण्याचे आमिष देत घरी घेऊन जात अत्याचार केल्याचे चिमुकलीने सांगितले.  (Latest Marathi News)

दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख याला तातडीने ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.  (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

SCROLL FOR NEXT