GEN Z FORCES DHARMENDRA PRADHAN RESIGNATION saam tv
महाराष्ट्र

Gen Z नं सरकारच्या झिंज्या उपटल्या, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

Gen Z Protest Forces Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; ‘Gen Z ने सरकारच्या झिंज्या उपटल्या’ म्हणत तरुणांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्कवर भव्य मोर्चाची घोषणा.

Omkar Sonawane

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी या राजीनाम्याला तरुणांच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले. ते म्हणाले, जेनझीनं (Gen Z) सरकारच्या झिंज्या उपटल्या, यासाठी अभिजीत दीपके आणि सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष झालाच पाहिजे आणि तो आम्ही उद्या करणार आहोत.

कधी नव्हे ते हे सरकार कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र, आता हे प्रकरण रंग शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरून पंतप्रधानांपर्यंत गेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात अनेक वेळा नीट परीक्षेचे पेपर फुटले. जर त्यांनी आधीच राजीनामा दिला असता, तर हे प्रकरण इतके ताणले गेले नसते आणि तापले नसते.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला नेमके का गेले आहेत, हे आता हळूहळू कळेलच, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तसेच, तरुणांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या शिवाजी पार्कवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून अभिजीत दीपके आणि तरुणाईचे कौतुक त्यांनी पुन्हा एकदा केले.

पूर्वी रेल्वे अपघात झाल्यावर हेच भाजपवाले रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायचे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यावर त्यांच्यावर तत्काळ कारवाई होते. मग आंदोलक तरुणांवर पोलिसांनी जी अमानुष मारहाण केली, त्या दोषींवर कारवाई का नाही व्हायला हवी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उमरखेडमध्ये दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी

Room Number 13: कोणत्याही हॉटेलमध्ये १३ नंबरची खोली का नसते? जाणून घ्या यामागची ७ रंजक कारणं

Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा हे मी मोदींना सांगितलं होतं: शरद पवार

Kanjivaram Paithani Saree: लग्नसमारंभ, कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग एकदा पाहाच या ७ सुंदर कांजीवरम पैठणी साड्या

Jagannath Rath Yatra : जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी, मृतांची संख्या ४ वर; १०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT