GB Syndrome  Saam Tv
महाराष्ट्र

GBS In Sangli: सांगलीत GBS चा शिरकाव! तीन रुग्ण आढळले; प्रशासन अलर्ट मोडवर

GB Syndrome Patient Found in Sangli: पुण्यानंतर आता सांगलीतदेखील गुइलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहे. तीन तरुणांना या आजाराची लागण झाली आहे.

विजय पाटील

सध्या राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यात सर्वात आधी गुइलेन बॅरी सिंड्रोमचा रुग्ण आढळला. त्यानंतर सोलापूरमध्ये रुग्ण आढळले आहे. त्यानंतर आता सांगलीतदेखील गुइलेन बॅरी सिंड्रोम चा सांगलीत शिरकाव झाला आहे. सांगली तीन रुग्ण आढळले आहे. या तिन्ही रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पुणे शहरात वेगाने पसरत असलेल्या गुइलेन बॅरी सिंड्रोम ने आता सांगलीत शिरकाव केला आहे. सांगलीत येथील चिंतामणीनगर, मर्दवाडी तर गुडमूडशिंगी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. या तिन्ही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. इलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्याच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हाता-पायांतली ताकद नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीबीएसचे रुग्णांची नोंद आहेत. दरम्यान, पुण्यात आज एकाही जीबीएस रुग्णांची नोंद झालेली नाही.पुण्यात जी बी एस ची रुग्ण संख्या १११ वर स्थिर आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रोज या आजाराच्या रुग्णांची होत नोंद होती.आज दिवसभरातून एक ही रुग्ण आढळून आलेला नाही, आरोग्य प्रशासनाची माहिती आहे.९ रुग्णांना आज रुग्णालयातून देण्यात डिस्चार्ज आला.आता या आजारामुळे पुणे विभागात एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय सह अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT