GB Syndrome Victim: Economics
महाराष्ट्र

GB Syndrome : जीबीएसने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन; आठवडाभरात जीबीएसचा चौथा बळी, वाचा

GB Syndrome In pune : आठवडाभरातच पुण्यात जीबीएसचा चौथा बळी गेलाय.. एवढंच नाही तर जीबीएसने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही शिरकाव केलाय..नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत आणि प्रशासनाने कोणत्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

पुण्यातला जीबीएस आता थेट रुग्णांच्या जीवावरच उठलाय. आतापर्यंत तब्बल चार जणांचे बळी या सिंड्रोमनं घेतले आहेत. रोज रुग्णांची संख्या वेगानं वाढत चाललीय. अनेक जण व्हेंटीलेटरवर आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण पसरलंय. यात कुणाचा बळी गेलाय ते पाहूयात..

GB सिंड्रोमचं थैमान

सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू

पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे बळी

पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू

पुण्याच्या नांदेड गावात 60 वर्षीय महिलेचाही अंत

जीबीएस आजाराचे रुग्ण फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच नव्हे तर अकोला आणि नागपूरमध्येही आढळून आलेत.. त्यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय...कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत? पाहूयात...

राज्यात जीबीएसचे किती रुग्ण?

पुणे - 113

पिंपरी चिंचवड- 9

अकोला- 5

नागपूर- 8

सांगली- 6

जीबीएसने राज्यभर हातपाय पसरायला सुरुवात केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय... तर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

जीबीएसवर मार्गदर्शक सूचना

क्षेत्रीय पातळीवर रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना करावी

प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात

नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा

पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धतेबाबत खात्री करावी

उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी

या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

गुईलेन बॅरी सिंड्रोम हा पुण्यातील दुषित पाण्यामुळे होत असल्याचं म्हटलं जात होतं.. मात्र पुण्यानंतर पिंपरी चिंचवड, सांगली, अकोला आणि नागपूरमध्येही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय....त्यामुळे राज्यभरात तातडीनं उपाय योजन्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT