Gautami Patil Ganeshotsav program controversy in Pune saam tv
महाराष्ट्र

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

BJP MP Medha Kulkarni On Gautami Patil: पुण्यात गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी धार्मिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक स्वरूप बिघडवणाऱ्या कार्यक्रमांवर सवाल उपस्थित केला आहे.

Suprim Maskar

पुण्यात गणेशोत्सवात डीजेवरून वातावरण गरम असताना आता गौतमी पाटलाच्या कार्यक्रमांवरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरवर्षीच दहीहंडी आणि गणेशोत्सवात गौतमी पाटलाच्या कार्यक्रमांचा धडाका असतो. पुण्यात अनेक ठिकाणी तिच्या डान्स गाण्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याविरोधात भाजपच्या पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. गणेशोत्सवाचे सांस्कृतिक स्वरूप बिघडवणारा हा धांगडधिंगा कशाला? असा सवालच मेधा कुलकर्णींनी उपस्थित केलाय.

दरम्यान पुण्यातील २०० मंडळांनी 'डीजे न वापरण्याची' भूमिका घेतली असली, तरी अनेक गणेश मंडळांनी DJच्या समर्थनार्थ आक्रमक पवित्रा घेतलाय...अशातच डीजे आणि उच्च डेसिबलच्या आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर बोट ठेवत.. उत्सव हा धार्मिक आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा झाला पाहिजे, असं म्हणत डीजेचं समर्थन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना मेधा कुलकर्णींनी घरचा आहेर दिलाय.

एकीकडे गणेशोत्सवात गौतीम पाटीलच्या कार्यक्रम नको, अशी भूमिका भाजप खासदारनं घेतलेली असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात दहिहांडीच्या कार्यक्रमात गौतमीनं कसा डान्स केलाय... ते ही पाहा. पाहिलतं. याचं डान्सनंतर आजारी असल्याचं सांगत.. गौतमीनं दहिहांडी पथकांना काय सल्ला दिलाय. तोही ऐका.

पुण्यातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे... काळानुरूप उत्सवाच्या स्वरूपात बदल झाला असला, तरी सध्या डीजे, प्लाझ्मा लेझर आणि प्रेशर मिड आवाजाबाबत समाजात दोन वेगवेगळे विचारप्रवाह स्पष्टपणे दिसून येत आहेत. अशातच गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमात होणारा धिंगडधिंगा कोणालाच पटणारा नाही... त्यामुळे सणाचं पावित्र्य राखत अश्लील डान्सला सण- उत्सवात तरी बंदी घातली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Bandh : २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक; महाराष्ट्रातही पडणार पडसाद, बड्या नेत्याची घोषणा

तिन्ही ठाकरे आंदोलनाच्या मैदानात; शिवसेना भवनाबाहेर जोरदार गोंधळ, आदित ठाकरेंनी अडवली पोलिसांची व्हॅन

Maharashtra News Live Update: आदित्य - तेजस- अमित ठाकरेंनी पोलिस व्हॅन अडवली

Saasre Bapre: एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी! भरत जाधवचा 'सासरे बापरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pimpri-Chinchwad Forts : वीकेंडला किल्ले फिरायचंय? पिंपरी-चिंचवडजवळ आहेत 'हे' ७ ऐतिहासिक गड-किल्ले

SCROLL FOR NEXT