Gautami Patil Dance Program In Latur:  Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांची हुल्लडबाजी, हाणामारीचा VIDEO आला समोर

Gautami Patil Dance Program In Latur: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा, हे जणू आता समीकरण झालं आहे. आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमात अनेकवेळा तरुणांनी राडा केला आहे. मात्र यंदा जरा वेगळीच बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संदीप भोसले

Gautami Patil Dance Program In Latur: 

नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा, हे जणू आता समीकरण झालं आहे. आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमात अनेकवेळा तरुणांनी राडा केला आहे. मात्र यंदा जरा वेगळीच बातमी समोर आली आहे. रविवारी लातूरच्या उदगीर इथं गौतमी पाटीलच्या संस्कृतीक कार्यक्रमाला चहात्यांनी तोबा गर्दी केली होती.

गौतमीची आदा पाहण्यासाठी तरुणांसह तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तरुणांसोबत तरुणीने देखील गौतमीला पाहण्यासाठी गोंधळ घातला. यावेळी महिलांमध्ये हाणामारीची घटनाही घडली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमीच्या उदगीर येथील कार्यक्रमात तरुणांसोबत मोठ्या प्रमाणात तरुणीही जमल्या होत्या. मोठ्या संख्येने लोक जमल्याने अनेक महिलांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यातच बसण्याच्या जागेवरून काही महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना यावेळी घडली. (Latest Marathi News)

महिलांमध्ये हाणामारी झाल्यावर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला होता. यातच पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत या भांडण करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आणि चोप दिल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याआधीही गौतमीच्या कार्यक्रमात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. अलीकडेच सोलापूरच्या गौतमी पाटीलाच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला आहे. हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली होती. सोलापूरच्या मंद्रूपमध्ये गौतमी पाटील्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही तरुणांनी दगडफेकही केली होती. ज्यामुळे काही महिला जखमी झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT