Gautami Patil Dance Viral Video Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा; शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले अन्...

बीडमध्ये गौतमीच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

विनोद जिरे

बीड : लावणी डान्सर गौतमी पाटील ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिकेची झोड उठली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. दरम्यान, आता बीडमध्ये गौतमीच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

बीड (Beed) जिल्ह्यातील राजुरी शिवारात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमीचा डान्स सुरू असताना, शेकडो लोक स्टेजवर चढल्याने एकचं गोंधळ उडाला होता. यावेळी स्टेजवर दगडफेक देखील झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला होता. यात गौतमी पाटील सुखरूप आहेत. मात्र चालू कार्यक्रम बंद करण्याची नामुष्की आयोजकावर ओढवली. ऐन रस्त्यालगत कार्यक्रम असल्याने बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १ तास ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच गौतमीला (Dance Video) पाहण्यासाठी काही हौशी तरुण झाडावर चढले होते. ग्रामपंचायत निवडणुकीची आचार संहिता लागू असताना या कार्यक्रमा परवानगी दिली कोणी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीड शहराजवळील बीड-परळी राष्ट्रीय महामार्गलगत घोडका राजुरी शिवारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ता तथा बारमालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सचिन लांडे यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला हजारो तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमाच्यावेळी तुफान राडा झाला. यामुळं गोंधळ आणि धिंगाणा झाल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandhan Valley : सप्टेंबरमध्ये घ्या अविस्मरणीय अनुभव; मुंबई-नाशिकहून सांधण व्हॅलीला पोहोचण्याची संपूर्ण माहिती

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT