कचरा उचलल्या जात नसल्याने नगर पालिकेतच फेकला कचरा ! प्रसाद नायगावकर
महाराष्ट्र

कचरा उचलला जात नसल्याने नगर पालिकेतच फेकला कचरा !

यवतमाळ येथे कचरा कंत्राटदार कामकरीत नसल्याने चार नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा स्वतः ट्रॅक्टरने उचलून नगर परिषदेच्या प्रवेश द्वारावर टाकला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : यवतमाळ Yavatmal येथे कचरा कंत्राटदार कामकरीत नसल्याने चार नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा स्वतः ट्रॅक्टरने उचलून नगर परिषदेच्या Municipality प्रवेश द्वारावर टाकला आहे. यावेळी पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला असून कंत्राटदार आणि नगरसेवक यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. Garbage was thrown in the municipality

हे देखील पहा -

मागील वर्षभरापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डम्पिंग ग्राउंड Dumping Ground पासून तर कंत्राटदाराचे कचरा गोळा करणारे कर्मचारी यांचा संप असो प्रत्येक वेळी नागरिकांना यातून त्रस्त व्हावे लागले. आठ दिवसापूर्वी नगरसेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकल्याची घटना ताजीच आहे. यानंतर तातडीने पावले उचलून कचऱ्याचा ठेका काढण्यात आला.

मात्र, आज आठ दिवस झाले तरी शहरातील कचरा उचलण्यात आल्याने नगरसेवक व नागरिक त्रस्त झाले आहेत. शेवटी आज प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 26, 28 या प्रभागाच्या नगरसेवकांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरने कचरा गोळा करून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून टाकला. तातडीने प्रभागातील कचरा जर उचलण्यात आला नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT