देवगडच्या वैद्यकीय अधिकारी निवासस्थानात कचऱ्याचे साम्राज्य ! अनंत पाताडे
महाराष्ट्र

देवगडच्या वैद्यकीय अधिकारी निवासस्थानात कचऱ्याचे साम्राज्य !

या कचऱ्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह मयत रुग्णांचे साहित्य, तसेच कोविड सेंटर मधील ओला व सुका कचरा एकत्र करून मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यात आलेला आहे.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : देवगड जामसंडे नगरपंचायतचा स्वच्छतेबाबत बेफिकीरपणा जनतेसमोर उघड झाला आहे. देवगडच्या कोविड सेंटरमधील ओला व सुका कचरा चक्क कोविड सेंटर समोर असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानातील रूममध्ये कचरा साठवून ठेवण्यात आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हे देखील पहा -

या कचऱ्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह मयत रुग्णांचे साहित्य, तसेच कोविड सेंटर मधील ओला व सुका कचरा एकत्र करून मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यात आलेला आहे. सुमारे 50 ते 60 मोठ्या पिशव्या भरून हा कचरा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूममध्ये ठेवण्यात आला असल्याचे शिवसेना पदाधिकारी यांच्या निदर्शनास येतात त्यांनी याबाबत नगर पंचायतीला निवेदन देऊन संबंधित प्रकार उघडकीस आणला आहे.

कोविड सेंटरच्या बाजूला असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानातील रूममध्ये हा साठवून ठेवलेला कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. एकीकडे स्वच्छतेचा नारा देत असताना अशा अस्वच्छतेमुळे रोगराई वाढल्यावर कोण जबाबदार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेने संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपंचायतीने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा डेपोमध्ये नेऊन या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT