kokan, ganeshotsav 2022, ganpati , ganesha saam tv
महाराष्ट्र

Kokan Ganeshotsav : एक दाेन तीन चार गणपतीचा जय जयकार..., तळकोकणात बाप्पाचं आगमन जल्लाेषात

एकूणच आजच्या गणेश चतुर्थी निमित्त भक्तांचा उत्साह शिगेला पोचला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kokan Ganeshotsav 2022 : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर आज राज्यभरात वाजत गाजत गणपती बाप्पांना घराे घरी तसेच सार्वजनिक गणेशाेत्सव (Ganesh Utsav) मंडळात आणलं जात आहे. काेराेनाचे संकट काहीशा प्रमाणात दूर झाल्याने गणेशभक्त आनंदित आहेत. राज्यभरात गणपती बनविल्या जाणा-या कार्यशाळेतून, कारखान्यातून, दुकानातून गणरायांचा जयघाेष करीत बाप्पांना घरी नेलं जात आहे. काेकणात (kokan) देखील यंदा माेठ्या उत्साहाने गणेशाेत्सव साजरा केला जात आहे.

तळकोकणात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झालं. घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत भक्तीमय वातावरणात नेलं जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आलेला गणेशोत्सव यंदा मात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

घराेघरी गणपती नेताना बच्चे कंपनी गणपती बाप्पा माेरयाचा जयघाेष करीत आहे. छाेट्या माेठ्या वाहनातून बाप्पा घरी पाेहचताच त्यांची विधिवत पूजा अर्चा केली जात आहे. गणेशाेत्सवासाठी यंदा लाखो चाकरमानी तळकोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 68 हजार 335 घरगुती तर 35 सार्वजनिक गणपती मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. एकूणच आजच्या गणेश चतुर्थी निमित्त भक्तांचा उत्साह शिगेला पोचला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT